मुंबई

दोन दिवसात ५ घरफोड्या

CD

खारघर, सीबीडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
दोन दिवसांत पाच घरफोड्या, तब्बल २८ लाखांच्या ऐवजाची चोरी

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी सध्या खारघर, बेलापूरमध्ये धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत पाच घरफोड्या करून तब्बल २८ लाखांचा ऐवज लंपास केल्‍याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खारघर सेक्टर १६ मधील वास्तूविहार संस्कृती सोसायटीमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी (ता. ४) पहाटे एकाच वेळी तीन घरे फोडली. त्यापैकी अतुल पालोदकर यांच्या घरातून रोख रक्कम व दागिने असा १७ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरला. पालोदकर कुटुंबीय आईच्या वर्षश्राद्धासाठी गावी गेले असताना, चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली. दरम्यान, चोरट्यांनी त्याच इमारतीतील प्रणिती हिंदळेकर, रॉजर डव्हीड मेल यांच्यादेखील घरातूनही चोरी करून किमती ऐवज लंपास केला. खारघर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीडी सेक्टर ८ बी मधील कल्पतरू सोसायटीतील रहिवासी व्यावसायिक प्रकाश ढापरे यांचे वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते मूळ गावी कुटुंबासह गेले होते. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी गुरुवारी (ता. ३) भरदिवसा त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने असा १० लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी ढापरे यांच्या शेजारी राहणारे भरत पाटील यांच्या घराचे लॉक तोडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे देवाचे चांदीचे दागिने पळवले. सीबीडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शुक्रवारी लग्न, मंगळवारी पुन्हा तुरुंगात जावं लागणार! माजी खासदाराच्या ५२ वर्षीय लेकाला सुप्रीम कोर्टाचा दणका

Latest Marathi News Updates : श्रेय दुसऱ्या कोणाचं नाही तर गरीब मराठ्यांचा आहे - मनोज जरांगे

Ganesh Visarjan 2025: 'काेल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीतही साउंडमुळे कानठळ्‍या'; शहरातील ४१ मंडळांवर खटले : पदाधिकारी, सिस्टीम मालकांना प्रकरण भोवणार

Asia Cup 2025 मध्ये अर्शदीप सिंग घडवणार इतिहास, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला करणार पराक्रम

श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ

SCROLL FOR NEXT