मुंबई

लाखभर लाभार्थींचा ई-केवायसी अपूर्ण

CD

लाखभर लाभार्थ्यांचे ई-केवायसी अपूर्ण
१० जुलै अंतिम मुदत; शिध्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली असतानाही तालुक्यातील जवळपास एक लाख सात हजार ५५८ लाभार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. ३० जूनला ई-केवायसीसाठी दिलेली अंतिम मुदत संपुष्टात आली. आता सरकारने ई-केवायसी न झालेल्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यामुळे लाखाच्या वर लाभार्थी शिधा पुरवठ्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
वारंवार मुदतवाढ देऊनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्‍यास धान्य पुरवठा बंद केला जाऊ शकतो आणि त्‍यास सर्वस्‍वी शिधापत्रिकाधारकच जबाबदार राहतील. यासोबतच अशा लाभार्थ्यांची नावे शिधा वितरण केंद्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून, नागरिकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पनवेल तालुका पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांनी केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास अवघे चार दिवस शिल्‍लक आहेत. अंतिम टप्प्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी वेळेआधी ई-केवायसी करून शिधा पुरवठा नियमित राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही धनवे यांनी केले आहे. ई-केवायसीसंदर्भात १० जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. या अहवालानंतर ज्‍या शिधापत्रिकाधारकांनी केवायसी केलेले नाही, त्यांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांचे अंगठे पॉस मशीनवर उमटत नाही व तांत्रिक अडचणी येत आहेत, तशांची यादी वेगळी ठेवण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्‍या आहेत. तसेच वयोवृद्ध व लहान मुलांचे अंगठे उमटत नसल्यास त्यांची यादी सरकारला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. ई-केवायसीसाठी जवळच्या अधिकृत केंद्रावर आधार कार्डसह भेट देणे आवश्यक आहे तर काही ठिकाणी ऑनलाइन पर्यायही उपलब्ध आहे. राज्य सरकारचा उद्देश शिधापत्रिका व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासोबतच बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा आहे. यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत अन्नधान्याचा लाभ नीट पोहोचू शकेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

ई-केवायसी न होण्याची कारणे
- आधार लिंक न होणे
- वृद्धांच्या बोटाचे ठसे न ओळखणे
- ग्रामीण भागात माहितीचा अभाव
- ई-सेवा केंद्रांची अपुरी संख्या
- इंटरनेट जोडणीची समस्या

‘आधार’चाच अडथळा
ई-केवायसी प्रक्रियेमध्ये आधार कार्ड लिंक न होणे, अंगठा न ओळखणे, मशीनने ठसे न उमटणे, अशी तांत्रिक कारणे अडथळा ठरत आहेत. ग्रामीण भागात साक्षरतेचा अभाव, तांत्रिक त्रुटी आणि मार्गदर्शनाचा अभाव ही कारणे आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकात चूक आहे. अनेक वृद्धांचे ठसे उमटत नसल्‍याने ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

१० जुलैपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी न झालेल्या व्यक्तींची यादी प्रत्येक शिधावाटप दुकानदारांना कार्यालयाद्वारे पुरवण्यात आली आहे. गावोगावी दवंडी देऊन तसेच लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानदाराच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याबाबत सूचना दिल्या आहेत. ई-केवायसीसंदर्भात १० जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. अहवालानंतर जे शिधापत्रिकाधारक केवायसी केली नाही त्यांचे धान्य बंद होण्याची दाट शक्यता आहे.
- अश्विनी धनवे, पुरवठा अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT