मुंबई

भिवंडीकरांचा वर्षभरापासून भ्रमनिरास

CD

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : लोकसभा मतदारसंघाच्या विकासावरून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि खासदार सुरेश म्हात्रे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भिवंडीकरांचा वर्षभरात भ्रमनिरास झाला असून, जनतेची दिशाभूल झाल्याची टीका कपिल पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदतेतून कपिल पाटील यांनी १० वर्षांत काहीही काम केले नसल्याचा आरोप केला होता. त्यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीदेखील पलटवार करताना केलेल्या आरोपांचे खंडन करीत पुरावे सादर केले. या वेळी टोरंट पॉवर, वऱ्हाळदेवी तलाव, कल्याण-मुरबाड रेल्वे अशा विविध प्रश्नांवर कपिल पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली. निवडणुकीच्या वेळी टोरंट कंपनी हटविण्याची घोषणा खासदारांनी केली होती. त्याबाबत कपिल पाटील यांनी माहिती देताना टोरंट पॉवरचा करार हा २०२७ पर्यंत होता. तोपर्यंत टोरंटला हटविता येणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१३मध्ये भिवंडीच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात टोरंट आले होते. खासदारकीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला या कराराबाबत काही माहिती नव्हते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर भिवंडीतील आयजीएम हॉस्पिटलला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचा मुद्दा हा तांत्रिक आहे. या रुग्णालयाची क्षमता २०० बेडची असून, नियोजित माता-बाल रुग्णालयही २०० बेडचे आहे. त्यामुळे या हॉस्पिटलला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा सहज मिळू शकेल; परंतु टोरंट, आयजीएमसारखे राज्य सरकारशी संबंधित विषय संसदेत मांडून स्वत:ची पाठ थोपटली जाते, अशी टीका केली.
---------------------------------
विकासकामांचा वाचला पाढा
भिवंडी लोकसभा मतदारसंघात १० वर्षांत खासदार म्हणून काम करताना झटत होतो. त्यातून ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वे अशी असंख्य छोटी-मोठी कामे मंजूर करून घेतली होती. मात्र गेल्या वर्षभरात कोणतीही कामे पत्र देऊन होत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. ठाणे-भिवंडी मेट्रो, मुरबाड रेल्वे प्रकल्प मंजूर केला. वडपे ते नाशिक या सहापदरी महामार्गाची मागणी केली होती. या कामालाही नाशिकच्या बाजूने सुरुवात झाली असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT