मुंबई

दिंडी सोहळ्यात स्वच्छतेचा जागर

CD

दिंडी सोहळ्यात स्वच्छतेचा जागर
वाशी, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. त्यासोबतच सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेतून आरोग्य जपणुकीचा संदेशही प्रसारित करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करावे येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहयोगाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. ६०० हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांच्या सहभागाने हा दिंडी सोहळा लक्षणीय झाला.
या दिंडी सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासमवेत घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ १ उप आयुक्त डॉ. अजय गडदे तसेच परिमंडळ २ उप आयुक्त स्मिता काळे, परिमंडळ १ उप आयुक्त सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे, दिंडीप्रमुख हरेश तांडेल आणि शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा व ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा ठेवलेल्या पालखीचे पूजन करून ज्ञानदीप सेवा मंडळाच्या विद्यालयापासून सुरू झालेल्या या स्वच्छता दिंडी सोहळ्यात श्रीविठ्ठल, श्रीरखुमाई, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत मीराबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग घेतला. पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानोबा माउली तुकाराम या नामगजरात लेझीम, टाळमृदुंग, शालेय बँडच्या गजरात शाळेपासून सीवूड येथील नेक्सस मॉलपर्यंत जाताना दिंडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता संदेशाचे फलक झळकावीत, घोषणा देत स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले. नेक्सस मॉलच्या पोडियमवर वारीच्या परंपरेनुसार रिंगण घालण्यात आले. या वेळी बाल कीर्तनकार मनीष गजभर याने कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छताविषयक प्रबोधन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

Uttar Pradesh Tourism : गोव्यासारखा सुट्टीचा आनंद लुटा युपीमध्ये; यमुना नदीच्या पवित्र पाण्यात मिळवा बोटींगचा आनंद!

Nobel Prize: ''मी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल समर्पित करते'', मारिया मचाडो यांच्या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

SCROLL FOR NEXT