मुंबई

गेरसे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित

CD

शहापूर, ता. ७ (वार्ताहर): वासिंद गावाला जोडणाऱ्या गेरसे गावाजवळचा भातसा नदीवरील पूल संरचनात्मकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक पुलावरून बंद करण्याची तूर्तास गरज नसल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या हद्दीत येणारा हा पूल अनेक वर्षे जुना आणि देखभाल दुरुस्तीअभावी जीर्ण झाला आहे. पुलाच्या कठड्यांना तात्पुरत्या स्वरूपात लाकडी बांबू दुतर्फा बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याच अनुषंगाने दोन्ही बाजूंच्या कठड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच पुलावरील १०० मीटर लांबीचा तसेच ७.५० मीटर रुंदीचा पूल मंजूर झाला असून, ठेकेदाराला १६ जून रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली, फोर्टीस रुग्णालयात दाखल

तुरुंगातून बाहेर पडताना आरोपीनं चोरलं तुरुंग प्रशासनाचं चेकबूक; बहिणीचं लग्न उरकलं, बुलेटही घेतली

Laxman Hake: राज्‍य सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय: ओबीसींचे नेते प्रा. लक्ष्मण हाके; राज्य सरकारने काढलेला जीआर रद्द करावा

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षण सोडती सुरू; निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट

Cough Syrup Deaths Case : कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर ईडीची कारवाई, श्रीसन फार्मासह एफडीए अधिकाऱ्यांच्या ७ ठिकाणांवर छापे

SCROLL FOR NEXT