मुंबई

डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा अखेर सुरु

CD

डोंबिवलीत सिग्नल यंत्रणा अखेर सुरू
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील चार रस्ता हे वाहतूक कोंडीचे मुख्य ठिकाण आहे. या मार्गावर होणाऱ्या कोंडीने चालक तसेच वाहतूक पोलिसदेखील त्रासले होते. काही वर्षांपूर्वी कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती; मात्र या सिग्नलची दिशा योग्य नसल्याने ते बंदच होते. अखेर रविवारपासून ही सिग्नल यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे आता वाहतुकीचे नियोजन करणे सोपे होणार आहे, तसेच वाहतूक कोंडी कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

डोंबिवली शहरात बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी गटार बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे शहराच्या ठरावीक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वेतील मानपाडा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत मुख्य मार्गावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती.

स्मार्ट सिटी विभागातर्फे चार रस्त्यावर सिग्नल बसविले होते, परंतु या ठिकाणी सिग्नलचे खांब बसविल्यानंतर त्यांचा या भागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते करताना अडथळा येत होता. तसेच सिग्नल यंत्रणा बसविताना दर्शक इशारे दिव्यांची दिशा उलटसुलट झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी टीका केली होती. त्यानंतर चार रस्ता चौकातील सिग्नल यंत्रणा बंद केली होती. या चौकात वाहतूक पोलिस नसतील, तर अभूतपूर्व अशा कोंडीने हा चौक गजबजून जातो. या रस्त्यावरील वाहनांचा वाढता भार विचारात घेत वाहतूक पोलिसांना या चौकात वाहनांचे नियोजन करताना दररोज कसरत करावी लागत होती. वाहतूक विभागही या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्नशील होता.

गेल्या आठवड्यात चार रस्त्यावर सिग्नल खांब आणि सिग्नल दिवे यंत्रणा बसविण्यात आली. या सिग्नलच्या योग्य त्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर रविवारी (ता. ६) चार रस्त्यावरील सिग्नल कल्याण-डोंबिवली पालिका स्मार्ट सिटी विभाग आणि वाहतूक विभागाच्या पुढाकाराने सुरू केला. ही सिग्नल यंत्रणा सुस्थितीत चालेल, यासाठी पालिका स्मार्ट सिटी विभाग आणि वाहतूक विभाग प्रयत्न करत आहे.

नियोजनावर टीका
डोंबिवली शहरातील चार रस्ता चौक हा सर्वाधिक वाहतूक वर्दळीचा चौक ओळखला जातो. शिळफाटा रस्त्यावरून येणारी वाहतूक, डोंबिवली शहरांतर्गत, कल्याण आणि इतर भागातून येणारी वाहने या चौकातून धावतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (घरडा सर्कल) सिग्नल यंत्रणेप्रमाणे चार रस्त्यावरील सिग्नल यंत्रणेचा खेळ होऊ नये, अशी मागणी प्रवासी करत आहेत. घरडा सर्कल येथील सिग्नल दोन ते तीन वर्षांपूर्वी सुरू केले होते. या सिग्नलमध्ये वाहने रोखण्याच्या वेळा अधिक प्रमाणात होत्या. परिणामी सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक सुस्थितीत राहण्याऐवजी या चौकात वाहतूक कोंडी होत असे. प्रवाशांकडून या नियोजनावर टीका करण्यात येत होती.

प्रवासी समाधानी
डोंबिवली-कल्याण शहरातील महत्त्वाच्या वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्याची प्रवाशांची मागणी आहे. चार रस्ता भागात एकावेळी तीन ते चार वाहतूक पोलिस, सेवक तैनात असतात. त्यांची नियुक्ती ठाकुर्ली उड्डाण पूल, चोळे रस्ता, पाथर्ली, इंदिरा चौक, फडके रस्ता भागात करण्याची प्रवाशांची मागणी आहे. यंत्रणा रविवारी सकाळपासून सुरू केली. सर्वाधिक वर्दळीच्या चार रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Ganpati Visarjan 2025 Live Updates : अयोध्येत भाविकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले

ZIM vs SL 2ndT20I : झिम्बाब्वेने इतिहास रचला, श्रीलंकेला १४.२ षटकांत हरवले; सिकंदर रझाने सूर्यकुमार, विराटचा विक्रम मोडला

गणेशभक्तांनो निश्चिंत व्हा! गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर, मुंबई लोकलने आखली विशेष रणनीती

SCROLL FOR NEXT