मुंबई

वंचित समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्‍हावे

CD

वंचित समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्‍हावे
बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन
पेण, ता. ७ (वार्ताहर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात अनेक ठिकाणी महाविद्यालयांची निर्मिती केली. त्‍यामुळे वंचित समाज आता प्रगतिपथावर जात असताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्यासह समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी पेण येथे बोलताना केले. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी पेण तालुका यांच्या वतीने ५ जुलै रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महात्मा गांधी वाचनालय सभागृहात करण्यात आला.
या वेळी ते म्हणाले की, रायगड जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षांबरोबरच स्पर्धा परीक्षेलासुद्धा तितकेच महत्त्व दिले पाहिजे. आपले संघटन अधिक मजबूत करून कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी या वेळी केले, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांकरिता अशीच संधी वारंवार मिळावी, असे वक्तव्य वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील धामणकर यांनी केले. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, वंचित जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, पेण तालुकाध्यक्ष सुनील धामणकर, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, माजी अध्यक्ष सुशील वाघमारे, प्रकाश सोनावणे, संतोष जाधव, किशोर वाघमारे, मंगेश कांबळे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य, समता सैनिक दल यासह विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live : यशस्वी जैस्वालच्या १७३ धावा, सर डॉन ब्रॅडमननंतर 'पठ्ठ्याचं'च नाव; भारताची पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या

Grok AI Photo To Video : प्रॉम्प्ट न टाकता फोटोपासून बनेल हवा तसा व्हिडिओ..इलॉन मस्‍कने आणलं जबरदस्त फीचर, वापरा एका क्लिकवर..

Lenskart UPI Feature: आता फक्त मोबाईलच नाहीतर युपीआय पेमेंटसाठी चष्मा देखील वापरता येणार; लेन्सकार्टकडून अनोखे फीचर लाँच

"मी तिला फोन केला तर ती रडू लागली" संयोगिता भावेंनी सांगितली प्रिया मराठेच्या अखेरच्या फोनची आठवण

ASIA CUP TROPHY UPDATE : माझ्या परवानगीशिवाय ट्रॉफी दिली, तर...! पळकुट्या मोहसिन नक्वीचा माजोरडेपणा

SCROLL FOR NEXT