मुंबई

नवी मुंबईत सर्वात मोठ्या हृदय तपासणी मोहिमेचे आयोजन

CD

नवी मुंबईत हृदय तपासणी मोहिमेचे आयोजन
पाचशेहून अधिक व्यक्तींनी केली मोफत हृदय तपासणी
नवी मुंबई (वार्ताहर) : व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या वतीने नवी मुंबईत आजपर्यंतची सर्वात मोठी हृदय तपासणी मोहीम राबवण्यात आली. या व्यापक आरोग्य उपक्रमात नवी मुंबई, रायगड, मुंबई, कल्याण, डोंबिवली व आसपासच्या भागांतील ५५० हून अधिक प्रौढांची मोफत तपासणी करण्यात आली.
या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांविषयी जनजागृती करणे, तसेच जोखीम असलेल्या रुग्णांचे लवकर निदान व वेळेवर उपचार यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे होते. हृदयरोग हे भारतात मृत्यूचे एक मुख्य कारण असल्याने, अशा प्रकारची शिबिरे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, असे हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनुज साठे यांनी सांगितले. अशा प्रकारची शिबिरे, हृदयरोगासारखे आजारपण जडलेल्या व्यक्तींची लवकर ओळख पटवण्यास मदत करतात व त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊन गंभीर गुंतागुंतीपासून त्यांचा बचाव करता येतो.
या शिबिरात डॉ. अनुज साठे आणि डॉ. निखिल परचुरे (हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. विजय डिसिल्वा (इंटेन्सिव्हिस्ट), तसेच डॉ. नितीन गुंद्रे आणि डॉ. अमित जावा (सीव्हीटीएस सर्जन्स) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व सल्लामसलत करण्यात आली. सामान्य नागरिकांना हृदयविकारांबाबत योग्य माहिती देणे आणि वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे डॉ. निखिल परचुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT