मुंबई

नोकरभरतीबाबत मार्गदर्शन शिबिर

CD

नोकरभरतीबाबत मार्गदर्शन शिबिर
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध विभागांमध्ये ४९० रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या नोकरभरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना शहर शाखा आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. याला इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे मागदर्शन शिबिर राबवण्यात आले. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात उपनेत्या विजया पोटे, आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

मागील महिन्यांत १० जून रोजी महापालिका प्रशासनाकडून ही नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यासाठी पूर्वी ३ जुलैची मुदत देण्यात आली होती; मात्र इच्छुक उमेदवारांनी केलेल्या विनंतीनुसार यामध्ये वाढ करून आता १५ जुलैपर्यंत इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे. तर अनेक वर्षांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे ही नोकरभरती केली जाणार आहे, त्यामुळे याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी साशंकता होती. ती दूर करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शहर शिवसेना शाखेला हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आम्ही हा महत्त्वाचा उपक्रम राबविल्याची माहिती शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

प्रलोभनाला बळी पडू नका
मागदर्शन शिबिरामध्ये शशिकांत बोरसे, पवनकुमार जोगदंडे, प्रशांत खैरनार या तज्ज्ञ व्यक्तींनी नोकरभरतीचा पेपर पॅटर्न, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, सराव पेपर, प्रशिक्षण, वेळेचे नियोजन यांसह जीके, जीएस, सीए आणि तांत्रिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तर या नोकरभरतीत कोणत्याही प्रकारचा वशिला चालणार नसून प्रत्येक उमेदवाराच्या मेरिटवरच निवड केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन या वेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B R Gavai: सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याचे नाव 'किशोर' नाही, 'असद' असते तर...? सुप्रीम कोर्टातील बूट घटनेवर महत्त्वाचे विधान

SBI Manager Cyber Fraud : सायबर ठगांनी स्टेट बँकेच्या मॅनेजरलाच लावला चुना, तब्बल १३ लाख लुटले; पोलिसांत तक्रार दाखल

राज्यभरात थांबवलं 'मनाचे- श्लोक' चित्रपटाचं प्रदर्शन, चित्रपटाचं नाव बदलणार, मृण्मयी पोस्ट शेअर करत म्हणाली...'अतिशय दु:खद'

Pune Weather: पुढील ४८ तासांत पुण्यातून मॉन्सूनची माघार, ५ दिवस उन्हाचा चटका

Premature Baby Miracle: डॉक्टरांच्या सेवेतून उमलली तीन जीवांची नवी पहाट; अवघ्या ५५०, ७४० अन ८०० ग्रॅम वजनाच्या बाळांवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT