कक्कया समाजासाठी आर्थिक महामंडळ द्या
आझाद मैदानात धरणे आंदोलन
धारावी, ता. ९ (बातमीदार) : चामड्याशी संबंधित काम करणाऱ्या कक्कया समाजाचे भले व्हावे, त्यांची प्रगती व विकास व्हावा, यासाठी संत कक्कया समाजाला आर्थिक विकास महामंडळ द्यावे, या मागणीसासाठी संत कक्कया समाजाने आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबईमार्फत गेल्या वर्षीही धरणे आंदोलन केले होते. त्या आंदोलनामध्ये राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत कक्कया समाजालासुद्धा महामंडळ दिले जाईल, असे सभागृहात जाहीर केले होते, परंतु एक वर्ष उलटूनही त्याची पूर्तता केली गेलेली नाही. सरकारला जागे करण्यासाठी धरणे आंदोलन केले होते, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
धरणे आंदोलनात धारावी, कुर्ला, नवी मुंबई व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. काँग्रेसच्या खासदार व मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, माजी खासदार राहुल शेवाळे, आरपीआयचे (आठवले गट) महाराष्ट्र सचिव गौतम सोनवणे यांनी आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला.
मंडळाचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. या वेळी संघटनेचे सचिव यशवंत नारायणकर, निवृत्ती सावळकर, हणमंत सोनावणे, राजकुमार सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे महादेव शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.