मुंबई

जेवणाच्या वेळेत बदल नको!

CD

जेवणाच्या वेळेत बदल नको!
मुंबईच्या डबेवाल्यांची मागणी
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा ८०० पेक्षा जास्त कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवले आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांत टप्प्याटप्प्याने बदल करण्यासाठी राज्य सरकारनेही या विषयात हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. कार्यालयाच्या वेळेत बदल करा; मात्र दुपारच्या जेवणाच्या वेळेत शक्य तो बदल करू नये, अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांकडून करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज एक हजार ८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यातून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी, गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेचे, शासकीय आणि खासगी कार्यालयांना पत्र पाठवून वेळेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कार्यालयाच्या वेळा बदलायच्या असल्‍यास निश्चित बदला; पण कार्यालयामधील जेवणाच्या वेळा बदलू नका. कार्यालयांमध्ये जेवणाच्या विविध वेळा झाल्यास डबेवाल्‍यांना त्या वेळा पाळणे शक्य होणार नाही. डबेवाल्यांची पुरवठा साखळी विस्कळित होईल. जेवण्याच्या वेळेत बदल झाल्यास तुटपुंज्या उत्पन्नासाठी जीवाचे रान करणाऱ्या डबेवाल्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. वेळेचे नियोजन न जमल्याने काही ग्राहक कमी होतील, काही कमी करावे लागतील. त्‍यामुळे मासिक उत्पन्नामध्येदेखील घट होऊ शकते, अशी भीतीही काही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

Latest Marathi News Updates: येवला रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

Ganesh Chaturthi 2025: आपण गणपती बाप्पा 'मोरया' का म्हणतो? हे आहे कारण

Factory Gas Leak: मोठी बातमी! मेट्रो मिल्क फॅक्टरीत अमोनिया गॅसची गळती, ३० ते ४० कर्मचारी अडकले, बचावकार्य सुरू

Video: बीडमध्ये राडा! लक्ष्मण हाके अन् पंडितांचे कार्यकर्ते समोरासमोर; हाकेंनी दिल्या थेट शिव्या

SCROLL FOR NEXT