मुंबई

गुजरातमधील सराईत दरोडेखोर मुंबईत जेरबंद

CD

गुजरातमधील सराईत दरोडेखोर मुंबईत जेरबंद
विक्रोळी पार्कसाइट पोलिसांची कारवाई
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः गुजरातमधील विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विक्रोळी पार्क साइट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तरबेज ऊर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठाण असे आरोपीचे नाव असून, त्याला सुरत येथील मगनधोबी वाडी, रामपुरा जिल्हा, सुरत येथून ताब्यात घेण्यात आले. पार्क साइट पोलिस ठाणे हद्दीत ७ जुलै रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास यातील फिर्यादीची पत्नी नूरजहाँ मुनाफ खान घरामध्ये एकट्याच असताना आरोपीने घरात घुसून नूरजहाँ यांच्यावर हल्ला केला. हात व डोक्याला दुखापत केली. त्यानंतर हातामधील सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गळ्यातील पेंडंट आणि एक सोन्याची साखळी असे एकूण एक लाख ५० हजार किमतीचे दागिने चोरले. याबाबत पार्क साइट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परिमंडळ ७चे पोलिस उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके बनवण्यात आली. त्यांच्याकडून घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून संशयित आरोपीचा मार्ग शोधण्यात आला. संशयित आरोपी निश्चित करून त्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी पार्क साइट पोलिसांनी केली. संशयित आरोपी घटनास्थळापासून विकोळीतून दादर व पुढे वांद्रे टर्मिनसला गेल्‍याचे दिसून आले. घटनास्थळाव्यतिरिक्त इतरही ठिकाणी मिळालेल्‍या आरोपीच्या फोटोच्या आधारे फिर्यादींच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता, तो त्यांचा नातेवाईकच असल्याचे तपासामध्ये स्‍पष्‍ट झाले.
संशयित आरोपी तबरेज ऊर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठाण याच्याबाबत तांत्रिक तपास करून माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानंतर पार्क साइट पोलिस पथक गुजरातला गेले. गुजरातमधील मेहसाणा जिल्‍ह्यातील कडी तालुक्‍यामधील आदुंद्रा या गावामध्ये आरोपी सापडला. त्याला अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्यावर गुजरातमधील सुरत येथे चोरी तसेच घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro News: महत्त्वाची बातमी! मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; पण कधीपासून? जाणून घ्या...

Ravindra Jadeja : 'वनडेत खेळायचंय, पण कर्णधार, कोच आणि...'ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यावर अन् वर्ल्ड कपबद्दल जडेजाने सोडलं मौन

2026 Numerology Prediction : कुणाची होणार फसवणूक तर कुणाला मिळणार यश ! मूलांकानुसार जाणून घ्या नव्या वर्षांचं भविष्य

Latest Marathi News Live Update : सरकारमधील मंत्र्यांच्या असंवेदनशीलतेचा मी निषेध करते - सुळे

Khadakwasala News : वारजेतील रस्त्यांवर उपमुख्यमंत्र्यांचा थेट दौरा; दिल्या तातडीच्या सूचना

SCROLL FOR NEXT