मुंबई

पुनर्विकास आराखड्याविरोधात निदर्शने

CD

पुनर्विकास आराखड्याविरोधात निदर्शने
धारावी बचाव आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात धारावी बचाव आंदोलनाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आराखडा तसेच प्रारूप परिशिष्ट-२ विरोधात गुरुवारी (ता. १०) धारावीकरांनी संत रोहिदास मार्गावरील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेजवळ आंदोलन केले. या वेळी राज्य सरकार व अदाणीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अदाणी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमडीपीएल) प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. तर दुसरीकडे प्रारूप परिशिष्ट-२नुसार ७५ टक्के रहिवासी अपात्र ठरले आहेत. याविरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत.
धारावीकरांना अपात्र ठरवत धारावीबाहेर फेकण्याचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. ‘नाही जाणार, नाही जाणार, धारावीबाहेर नाही जाणार’, ‘धारावी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत आंदोलनकत्यांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, माजी आमदार बाबुराव माने, शेकाप नेते राजेंद्र कोरडे, सम्या कोरडे, सीपीआय नेते कॉ. सीरुल हक, शिवसेना नेते विठ्ठल पवार, उलेश गजकोश, सीपीआयएमचे नेते वसंत खंदारे, बसपाचे श्यामलाल जैस्वार, सामाजिक कार्यकर्ते अनिल कासारे, आपचे नेते पॉल राफेल, मेघवाडी रहिवाशांचे नेते बिपीन पडिया आदी या वेळी उपस्थित होते.


विरोधाचे कारण
धारावी बचाव आंदोलनाने ५०० चौ. फुटाच्या घरांची मागणी केली आहे. ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. आता सेक्टर १ मधील नुकतीच पहिली प्रारूप परिशिष्ट २ यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ५०५ पैकी फक्त १०१ रहिवासी मोफत घरांच्या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे ७५ टक्के कुटुंबे धारावीच्या बाहेर फेकली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

आराखड्याची होळी करण्याची परवानगी नाकारली
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याची होळी करण्याचा निर्णय धारावी बचाव आंदोलनाने घेतला होता. मात्र त्यास परवानगी न मिळाल्याने आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते व धारावीतील जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. त्यांनी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलनस्थळी काही जणांनी आराखड्याची प्रतीकात्मक होळी करण्याचा प्रयत्न केला, पण तो पोलिसांनी होऊ दिला नाही. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: मोबाईल, हेडफोनवर बोलणाऱ्या बस चालकांची आता खैर नाही, 'पीएमपीएमएल'ने घेतला मोठा निर्णय

आनंदाची बातमी! 'दसरा-दिवाळीसाठी सोलापूर विभागातून २३० जादा गाड्या'; मध्य रेल्वेचा निर्णय, मराठवाड्यासह सोलापूरकरांची पुण्याला जाण्याची सोय

Pune News : ‘किरकी’ नव्हे, आता आपली ‘खडकी’च; मराठी अधिकाऱ्याच्या प्रयत्नांना यश, २०० वर्षांनंतर नावात बदल

Latest Marathi News Updates: सरकारचा १२ लाखांचा महसूल बुडाला, महसूल मंत्री बावनकुळेंनी महिला अधिकाऱ्याचं केलं निलंबन

Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिलांकडूनही गोलवर्षाव; सिंगापूरचा १२-० ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT