मुंबई

महागणपती मंदिर परिसरात चिखलाचे साम्राज्य

CD

महागणपती मंदिर परिसर चिखलमय
टिटवाळा, ता. १३ (वार्ताहर) : प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात; मात्र या श्रद्धास्थळाचे प्रवेशद्वारच सध्या चिखलमय झाले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. मंदिर परिसरात पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने चिखलाचा थर निर्माण झाला आहे. दुर्गंधी, डासांचा प्रचंड त्रास आणि अस्वच्छतेमुळे भाविकांची ससेहोलपट सुरू आहे.

वाहने पार्क करताना चिखलातून गाड्या घसरतात. त्यामुळे अपघात होतात. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंगीसारख्या आजारांचा धोका वाढत आहे. याबद्दल कितीही तक्रारी केल्या, तरी केडीएमसी किंवा मंदिर ट्रस्ट कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नुकताच कल्याणमधील बेतूरकरपाडा भागातील ३१ वर्षीय युवकाचा डेंगीमुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई पालिका रुग्णालयात दाखल केले होते, पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात साफसफाई करण्याची मागणी होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव
आरोग्य विभागाकडे आवश्यक कीटकनाशक फवारणीचे नियोजन नाही, शहरातील विविध भागात डास वाढत आहेत. फवारणी यंत्रणा केवळ कागदावर आहे. बांधकामांमुळे बंद झालेले रस्ते, गटारांची दुरवस्था, निचरा न होणारे पाणी या सगळ्या गोष्टी डासांचा प्रादुर्भाव होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहेत. परिणामी आजार पसरत आहेत. त्यातच महापालिकेच्या आरोग्य विभागात तीन महिन्यांपासून डॉक्टरांची टंचाई आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे उपचार विलंबाने होतात. यामुळे डोंबिवली, टिटवाळा, कल्याण परिसरातील रुग्णांना वेळेत निदान मिळत नाही. शासनाने याबाबत पालिकेला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cafe Goodluck News : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अन् पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेला टाळे, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपशी संबंध नाही- चंद्रशेखर बावनकुळे

Bacchu Kaduc: कडू यांनी पदयात्रेत डोळ्यावर बांधली पट्टी; सातबारा कोरा पदयात्रा, दिव्यांगांनी घेतला सहभाग

Ichalkaranji Crime : इचलकरंजीत ‘मिशन झीरो ड्रग्ज’, नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पण मुख्य सूत्रधार पळाला

माेठी बातमी! पटसंख्या घटलेल्या शाळांची आता गुणवत्ता पडताळणी; अधिकाऱ्यांची पथके देणार भेटी, शिक्षकांवर कारवाई हाेणार

SCROLL FOR NEXT