मुंबई

दिघ्‍यातून ७६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

CD

दिघ्‍यातून ७६ लाखांचे अमली पदार्थ जप्त
किंमत ७६ लाख ६९ हजार; चार आरोपी अटकेत, एक फरार

नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने शुक्रवारी (ता.११) सकाळी दिघा, ईश्वरनगर परिसरात दोन घरांवर छापेमारी करत तब्बल ७६ लाख ६९ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. कारवाईत चार जणांना अटक केली असून घटनास्थळावरून पळून गेलेल्‍या पाचव्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. कारवाईत अटक व फरार असलेले सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून अनेक महिन्यांपासून संघटीतरित्या अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात आढळले. त्यांच्या विरोधात मोक्कातंर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
दिघा ईश्वरनगर येथील ओमकार अपार्टमेंटमधील काही व्यक्ती मेफेड्रॉनची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक निरीक्षक गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी झडती घेतली. त्या ठिकाणी उषा रोशन नाईक व शैलेश बसन्ना नाईक ऊर्फ पिल्लू हे दोघेही सापडले. चौकशी करून पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली नंबर २०५ चा दरवाजा उघडताच उषा नाईकचा पती रोशन बसन्ना नाईक हा खिडकीतून उडी मारुन पळून गेला. या खोलीतील बाथरूम व संडासच्या वरच्या भागामध्ये लपवून ठेवलेले ५५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा १८६.५ ग्रॅम मेफेड्रॉन, पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्या, वजन काटा, रिकाम्या झिप लॉक पिशव्या सापडल्या. तसेच दुसऱ्या ठिकाणी चार लाख ५० हजार रुपये किमतीचे १५.० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ सापडले. हे अमली पदार्थ व साहित्य जप्त केल्यानंतर पुढील तपासात उषा नाईक व इतर आरोपींनी चौथ्या मजल्यावरील खोलीही त्‍यांचीच असल्‍याचे सांगितले. या खोलीचा दरवाजा उघडताच नीलेश बसन्ना नाईक ऊर्फ बाबू व ज्योती नाईक या दोघांनी खिडकीतून अमली पदार्थाची पिशवी खाली फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये सात लहान पारदर्शक पिशव्यामध्ये १० लाख ५६ हजार रुपये किमतीचे ३५.२ ग्रॅम मेफेड्रॉन आणि एक वजन काटा असल्याचे आढळला. तसेच घराच्या झडतीत बाथरूममध्ये लपवलेले चार लाख ६८ हजार रुपये किमतीचे १५.६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन आढळले.

पाच जणांवर गुन्हा
अमली पदार्थ विरोधी कक्षाने पाच जणांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एकूण २५२.३ ग्रॅम वजनाचे ७६ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन तसेच २ वजन काटे (गोल्डन व सिल्वर रंगाचे) आणि २०० रिकाम्या पिशव्या जप्त केल्या आहेत. कारवाईत अटक करण्यात आलेल्या चौघांच्या प्राथमिक चौकशीत त्यांनी शांताबाई करंडेकर या नातेवाईक महिलेकडून मेफेड्रॉन आणून विक्री करीत असल्याचे कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

साप्ताहिक राशिभविष्य : (१३ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५)

आशियाई अन्‌ विश्‍वकरंडकाच्या तयारीला वेग

पांढरी होणारी दाढी अन् निवृत्ती (एक काल्पनिक कथा)

SCROLL FOR NEXT