मुंबई

पेट्रोल-डिझेलच्या सव्वाकोटी रुपयांचा अपहार

CD

पेट्रोल-डिझेलच्या सव्वाकोटी रुपयांचा अपहार
व्यवस्‍थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १३ (बातमीदार) ः गेल्या सहा वर्षांत पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेल विक्रीतून जमा झालेल्या सुमारे सव्वाकोटीचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पेट्रोलपंपाच्या व्यवस्‍थापकाविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिंद्र रुपशंकर जोशी असे या व्यवस्‍थापकाचे नाव असून, तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. कुणाल महिंद्रा छेडा हे व्यावसायिक असून, त्यांच्या मालकीचा जोगेश्वरीतील आदर्शनगरात इंडियन ऑइल पेट्रोलपंप आहे. याच ठिकाणी महिंद्र जोशी हा काम करत होता. त्याच्यावर पेट्रोलपंपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती.
२०१९ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत काम करताना महिंद्रने पेट्रोलपंपात पेट्रोल व डिझेल विक्रीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केला होता. जानेवारी महिन्यात कुणाल छेडा यांनी अकाउंटसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार समजताच त्यांनी त्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले होते.
तपासादरम्यान पेट्रोलपंपाची जमा झालेली रक्कम आणि बँकेत जमा केलेल्या रकमेत तफावत असल्याचे दिसून आले होते. ही तफावत तब्बल एक कोटी २० लाख रुपयांची होती. महिंद्रने ८३ लाख ७० हजार रुपये त्याच्या मित्राच्या बँक खात्यात, तर पेट्रोल-डिझेल विक्रीतून जमा झालेल्या ३६ लाख ३४ हजार ८१८ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच कुणाल छेडा यांच्या वतीने त्यांचा व्यवस्‍थापक भावेश मारु यांनी ओशिवरा पोलिसांत महिंद्रविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ओबीसीं’साठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

गुलशन कुमार विनवणी करत राहिले पण गँगस्टर्सनी जीव घेतलाच; 'या' संगीतकाराच्या ईर्ष्येने कुटूंब उद्ध्वस्त !

Latest Maharashtra News Updates : पक्ष एकसंघ आहे, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे- तटकरे

NCP Meeting : भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक; नेमकी काय झाली चर्चा? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

India government Decision: केंद्र सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशमधून आलेल्या पीडित अल्पसंख्यांकांबाबत घेतला मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT