मुंबई

वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची मागणी

CD

विरार, ता. १३ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. वसईचा ऐतिहासिक किल्ला सुमारे ११० एकर क्षेत्रफळामध्ये पसरलेला असून, मराठा, पोर्तुगीज, आणि इंग्रज इतिहासाचे साक्षीदार असलेला वारसास्थळ आहे. या किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हात्रे यांनी पुरातत्त्व विभागाकडे पत्राने केली आहे.

पोर्तुगीज सत्तेसाठी हा किल्ला केंद्रबिंदू होता. नरवीर चिमाजी आप्पांनी १७३९ मध्ये लढाई करून तो जिंकला. हा किल्ला अजूनही स्थापत्यशास्त्र, समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण यंत्रणा आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध आहे. आजही अनेक पर्यटक, इतिहास संशोधक आणि स्थानिक लोक येथे भेट देतात, परंतु त्याच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न अपुरे आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. वसई किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वारसा नसून आपल्या संस्कृतीचा अभिमान व भविष्यकालीन पर्यटन केंद्र होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या जागतिक पातळीवरील मान्यतेसाठी आपण त्वरित पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

SCROLL FOR NEXT