मुंबई

स्मशानभूमीतील विजेच्या वस्‍तू दुरुस्‍त

CD

स्मशानभूमीतील विजेच्या वस्‍तू दुरुस्‍त
धारावी, ता. १३ (बातमीदार) : धारावीत हिंदूधर्मीयांसाठी असलेल्या एकमेव धारावी हिंदू स्मशानभूमीमध्ये गेल्‍या काही दिवसांपासून समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या गटांचा वावर दिसत आहे. त्‍यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. येथे दोन टोळ्यांमध्ये झालेल्‍या वादामध्ये फॅन व इतर विजेच्या उपकरणांचे, साहित्‍याचे नुकसान झाले होते. याबाबत ‘सकाळ’च्या २६ जूनच्या अंकामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत पालिकेने येथील वस्तू दुरुस्त करून घेतल्या आहेत.
स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यावर त्यासोबत आलेल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी निवारा शेड उभारण्यात आली आहे. या शेडमध्ये दिवाबत्तीची व पंख्यांची सोय करण्यात आलेली आहे. या निवारा शेडमधील दिवे या भांडणात फोडण्यात आले होते. तसेच पंख्यांचे नुकसान करण्यात आले. सुरक्षा रक्षक नसल्याने गुंड प्रवृत्तीची व समाजकंटक तरुण मुले येथे दिसतात, असा स्‍थानिकांचा आरोप आहे. त्यांना कुणी हटकल्‍यास ते मारहाण करतात. स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत सर्रासपणे क्रिकेट खेळले जाते. एखादी अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली तरीही मुले बाजूला होत नाहीत. त्‍यामुळे अंत्ययात्रेतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे स्मशानभूमीत सुरक्षेची मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT