मुंबई

साधुसंतांच्या महाराष्ट्राला ‘मद्यधुंद’ करण्याचा डाव

CD

साधुसंतांच्या महाराष्ट्राला ‘मद्यधुंद’ करण्याचा डाव
मद्यविक्री परवाने खुले करण्यास आव्हाड यांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : राज्यात ५० वर्षांनंतर सुमारे ३२८ मद्यव्रिक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी या सरकारने लाडक्या बहिणींच्या पतीला, पित्याला आणि भावाला मद्यपी करण्याचा चंग बांधला आहे. पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधुसंतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहे, अशी टीका आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी करून सरकारच्या मद्यविक्री धोरणाला विरोध केला. तसेच या निर्णयाविरोधात आता बहिणींनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही केले.

राज्य सरकारने मद्यविक्रीचे परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी (ता. १३) पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘१९७४ मध्ये तत्कालीन सरकारने मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मृणाल गोऱ्हे, अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवले. त्या वेळी सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. आता ५० वर्षांनंतर पुन्हा हे परवाने खुले करून सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये, यासाठी महाराष्ट्रातील जनतेने शुद्धीत राहूच नये याची तजवीज हे सरकार करीत आहे. पन्नास वर्षांपूर्वीचे परवाने १५ कोटी रुपयांना विकले जात आहेत. आता हे नवीन परवाने एक कोटीला विकले जाणार आहेत. हे परवाने ज्या ४७ कंपन्यांना दिले जाणार आहेत, त्यांचे संचालक कोण आहेत, हे जरा तपासून पाहा, असे म्हणत डॉ. आव्हाड यांनी ४७ कंपन्यांची यादीच वाचून दाखविली. या कंपन्यांच्या संचालकांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत ठाण मांडले असल्याचेही ते म्हणाले.

सरकारला सत्तेची झिंग
सत्तेची झिंग चढलेले हे सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राला गटारगंगेत टाकत आहे. त्यामुळेच या सरकारची निशाणी मद्याची बॉटल अशीच असणार आहे. २४० सदस्यांच्या पाशवी बहुमताने जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल, तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल, असा इशाराही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Mango City: फळांच्या राजाचं 'हे' आहे माहेरघर! 'मँगो सिटी'चा आंबा थेट रशिया-अमेरिकेपर्यंत फेमस कसा झाला? वाचा

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT