मुंबई

कामवारी नदीत मृतदेह आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह

CD

कामवारी नदीत आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील शेलार परिसरातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह कामवारी नदीत आढळून आला. सूरज तिवारी असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज हा खासगी शिकवणीसाठी घरातून निघाला होता, मात्र मध्येच तो मित्रांसोबत कामवारी नदीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात बुडाला. या वेळी घाबरलेले त्याचे मित्र कोणालाही काही एक न सांगता निघून गेले. त्यानंतर सूरजच्य कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर शनिवारी (ता. १२) त्याच्या मित्राने सूरज नदीत पोहण्यासाठी गेल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने कामवारी नदीपात्रात सूरजचा शोध सुरू केला होता. त्याचा मृतदेह रविवारी (ता. १३) दुपारी नदीपात्रात तरंगताना आढळून आळा. अग्निशामक दलाच्या जवानांनी सूरजचा मृतदेह नदीतून काढून पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena : ठाकरेंची मागणी मान्य पण तारीख सांगितली नाही; शिवसेना नाव अन् चिन्हावर सुनावणी पुढे ढकलली; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

ENG vs IND, 3rd Test: सिराजला इंग्लंडच्या ओपनरसमोर आक्रमक सेलिब्रेशन करणं पडलं महागात! ICC ने सुनावली शिक्षा

रुपाली भोसलेच्या 'लपंडाव'साठी स्टार प्रवाहची 'ही' मालिका घेणार निरोप; 'या' दिवशी होणार सुरू

जंगलातच मुलींचा जन्म, वडील कोण? २०१८पासून जंगल, गुहेत कशी राहिली रशियन महिला

Crocodile: ‘कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी; कऱ्हाडला नागरिकांत औत्सुक्य अन् घबराट; पावसाळ्यात पाणी वाढल्‍याने वावर

SCROLL FOR NEXT