
Bow & Arrow Symbol Case Postponed: शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं होतं. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्य याचिकेवर निर्णय करणे योग्य राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीवेळी म्हटलं. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलताना ऑगस्ट महिन्यातली तारीख देऊ. तोपर्यंत जर निवडणुका लागल्या तर निवडणूक लढा असंही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केलं.