मुंबई

विद्यार्थ्यांसाठी परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

CD

विरार, ता. १५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी परिवहन बससेवा बंद करण्यात आली आहे, ती तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत पालिका क्षेत्रातील विद्यार्थांसाठी मागील अनेक वर्षे बससेवा देत आहे. या योजनेचा लाभ सुमारे ४० शाळांतील अंदाजे आठ हजार विद्यार्थी घेत होते. या वर्षीच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून शासकीय धोरणानुसार ही सेवा ठेकेदार पालिकेला पुरवू शकत नाही, असे सांगण्यात आले. या प्रक्रियेत आतापर्यंत शाळा प्रशासन, परिवहन विभाग, ठेकेदार यांच्यात चर्चा सुरू आहेत, मात्र अद्यापही काही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अनेक मुले आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ती शाळेत पोहोचू शकत नाहीत, असे चेंदवणकर यांनी सांगितले. शिवसेनेच्या माजी गटनेत्या असल्याने हा विषय त्यांच्यासमोर आला, तेव्हा पालिकेशी पत्रव्यवहार करून संबंधित अधिकारी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, परिवहन विभागाचे अधिकारी, ठेकेदार, व्यवस्थापक आणि पालकांशी चर्चा घडवून आणली. याप्रकरणी लवकरच तोडगा काढू, असे पालिका प्रशासन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT