मुंबई

बोईसर आगारातील बस अपघातात चालक जखमी

CD

बोईसर आगारातील बस
अपघातात चालक जखमी
बोईसर, ता. १४ (बातमीदार) : बोईसर एसटी आगारात सोमवारी दुपारी नियंत्रण सुटल्याने बस थेट नियंत्रण कक्षाजवळील हिरकणी कक्षाला धडकली. या अपघातात चालक आदिनाथ कुटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये चालक आणि वाहक यांच्याशिवाय इतर कोणीही प्रवासी नव्‍हते. बसने धडक दिल्याने हिरकणी कक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. चालक आदिनाथ कुटे हे दोन आठवड्यांपूर्वीच कामावर रुजू झाले आहेत. सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजता ते बस देखभाल विभागातून बस पार्किंग क्षेत्रात नेत असताना त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघात झाला तेव्‍हा बस आगार परिसरात शंभरहून अधिक प्रवासी होते; मात्र अपघात झाला तेथे कोणीही नसल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे बस देखभालीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT