मुंबई

‘दलित पँथर’च्या चळवळीला उजाळा

CD

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार)ः केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांच्या समाजकारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच घाटकोपर येथील एका कार्यक्रमात ‘दलित पँथर’च्या आठवणींना उजाळा देणाऱ्या त्यांच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. पँथरचे सहकारी डी. एम. चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.
घाटकोपर पूर्वेकडील झवेरबेन पोपटलाल हॉलमध्ये रिपब्लिक नेते डी. एम. चव्हाण यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस रामदास आठवले यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले तसेच रिपब्लिक नेते गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, जयंती गडा यांच्यासह इतरही अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी चव्हाण यांच्यावर दादासाहेब यादव, अरुण वाघ, जीवन भालेराव, कुणाल तुरेराव यांनी संपादित केलेल्या एका विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी बोलताना आठवले यांनी पँथर काळातील आंदोलने, मोर्चे तसेच सामाजिक प्रश्नावर उभारलेल्या लढ्यांना उजाळा दिला, तर गौतम सोनवणे यांनीही पँथर चळवळ कशी उभी राहिली याबाबतचा आलेख डोळ्यासमोर उभा केला, तर डी. एम. चव्हाण यांनी दलित पँथरची चळवळ टोकाची होती. त्यामुळे अनेकदा सामाजिक अन्यायाविरोधात संघर्ष करावा लागत होता. आज परिस्थिती बदलली असली तरी समाजावरील अन्याय पूर्वीसारखेच दिसतात, असे मत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT