मुंबई

मोफत आरोग्य सेवा हीच अनमोल गुरुदक्षिणा

CD

विरार, ता. १५ (बातमीदार) : प्रमोद पवार मित्रपरिवाराने मोफत आरोग्यसेवेच्या रूपाने मला दिलेली ही गुरुदक्षिणा अनमोल आहे. त्याग आणि समर्पित भावनेने समाजासाठी तरुण मंडळी काम करतात, याचा मला गुरू म्हणून अभिमान वाटतो, असे प्रतिपादन विवेक पंडित यांनी केले. अंबाडी नाका येथे उभारलेल्या २५ खाटांच्या अत्याधुनिक आयसीयू आणि एनआयसीयू सुविधांनी युक्त हॉस्पिटलचे उद्‍घाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (मंत्री दर्जा) पंडित यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ते बोलत होते.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रमजीवी संघटनेचे युवा नेते प्रमोद पवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केलेले माउली चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्‍घाटन पार पडले. पंडित यांना गुरुदक्षिणा म्हणून या मोफत रुग्णालयाचे लोकार्पण केल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले. हे रुग्णालय कोणत्याही शासकीय योजना अथवा निधीशिवाय चालणारे पहिलेच ठरले आहे. नो कॅश काउंटर या क्रांतिकारी संकल्पनेद्वारे सर्व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करणारे हे हॉस्पिटल समाजासाठी एक नवीन आदर्श ठरण्याची शक्यता आहे. अभिनेता अमर उपाध्याय, खासदार डॉ. हेमंत सवरा, देवेंद्र पंड्या, शिवसेना नेते प्रकाश पाटील, श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, विजय जाधव, अजय मोरे, अतुल भट, डॉ. विनय पाटील, दशरथ पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले की, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता प्रमोद पवार मित्रपरिवार मोफत हॉस्पिटल सुरू करत आहेत, हे अभिमानास्पद आहे. तरुणाच्या या अभिनव उपक्रमाने समाजाला त्यागाचा संदेश दिला असून, मी कायम सोबत राहणार असल्याची ग्वाही देतो, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात असे तरुण सामाजिक काम करत आहेत, हे मला अचंबित करणारे आहे. मी या कार्यक्रमाने प्रेरित झालो असून, आजपासून या मित्रपरिवाराला मी जोडलो गेलो आहे, असे मत सिने अभिनेते उपाध्याय यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Updates : अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Video Viral: ट्रेनमध्ये मुलीला अश्लील हावभाव करताना विकृत कॅमेऱ्यात कैद, उतरण्यापूर्वी फोटोही काढले... संतापजनक व्हिडिओ

बँक ऑफ इंडिया शाखेला मोठी आग; घटनास्थळी खळबळ, कागदपत्रांची यादी जळाली

Pune Ganesh Visarjan 2025 : विसर्जन मिरवणुकीत वेळेपेक्षा सुरक्षेला प्राधान्य : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Crime: धक्कादायक! १५ दिवसांच्या नवजात बाळाला फ्रीजरमध्ये ठेवलं, निर्दयी आईचं कृत्य, कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT