मुंबई

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

CD

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता आणखी दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील श्रृष्टी विकास कुमार श्रीवास्तव (१७) हिचे कोणीतरी अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. १४) श्रृष्टीचे आई-वडील कामावर गेले होते. भाऊ शाळेत गेलेला असताना श्रृष्टीचे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केले आहे. दरम्यान, श्रृष्टीची आई कामावरून घरी परतल्यानंतर अपहरणाची बाब उघड झाली. वडील विकासकुमार त्रिपुरारीप्रसाद श्रीवास्तव यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या घटनेत शहर पोलिस ठाणे हद्दीतील महेक आशिकआली बेगम (१६) ही सोमवारी (ता. १४) सकाळी १० वाजता तिच्या बहिणीला कामानिमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगून गेली; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. दरम्यान, कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने तिचे कोणीतरी अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याच्या संशयावरून तिची आई आसमा बेगम हिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT