मुंबई

पर्यटन विकास आराखड्यासाठी विशेष बैठकीची मागणी

CD

विरार, ता. १५ (बातमीदार) : वसई-विरार उपप्रादेशिक विभागातील पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे लेखी पत्राद्वारे विशेष बैठक घेण्याची मागणी केली आहे.

वसई-विरारच्या परिसरात अनेक विविध प्रेक्षणीय स्थळे असून, त्यांचा सुयोग्य विकास अद्याप झालेला नाही. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत असून, सुविधा अपुऱ्या असल्याने या ठिकाणांचा पुरेपूर वापर होत नाही. या ठिकाणांसाठी आराखडा तयार करून पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण पावले उचलण्यासाठी पर्यटन विभागासोबत महसूल, नगरविकास, वन, पुरातत्त्व विभाग व वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी स्नेहा दुबे-पंडित यांनी केली आहे. या बैठकीतून वसई-विरार परिसराला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी दिशा ठरवता येईल, असेही त्या म्हणाल्या. विशेषतः स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, स्वच्छता, रस्ते, पाणी, शौचालय, सुरक्षाव्यवस्था यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT