मुंबई

वाशी स्थानकाला भिकारी, फेरीवाल्‍यांचा विळखा

CD

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : हार्बर मार्गावरील नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून वाशी रेल्वेस्थानकाची ओळख आहे. असे असली तरी स्थानकावरील तुटलेल्या कचराकुंड्या, लोखंडी बाकडे, पिण्याच्या पाण्याच्या नळाची दुरवस्था तसेच वाशी रेल्वेस्थानकाला भिकारी, फेरीवाले व गर्दुल्ल्यांचा विळखा पडल्‍याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मुंबईकडून नवी मुंबईला १९९२ मध्ये लोकल सेवा सुरू झाली त्या वेळेस पहिली लोकल वाशीपर्यंत धावली. नवी मुंबई या एकविसाव्या शतकातील शहराला साजेसे ठरेल अशा पहिल्या वाशी रेल्वेस्थानकाची उभारणी सिडकोने केली, परंतु देखभाल दुरुस्तीअभावी सध्‍या स्थानकाची दुर्दशा झाली आहे.
फलाटावरील लोखंडी बाकडे तुटलेले आहेत. तसेच भिकारी व फेरीवाल्यांनी स्‍थानकात, भुयारी मार्गात बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्‍ताप सहन करावा लागतो. वाशी रेल्वेस्थानक फलाट एकवर रेल्वे पोलिस ठाणे असले तरी अपुऱ्या मनुष्‍यबळाअभावी प्रवाशांची सुरक्षा सिडकोने नियुक्‍त केलेल्‍या सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून आहे. वाशी रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूस मोठ्या प्रमाणावर आयटी पार्क, मॉल, विविध राज्यांचे भवन तसेच वाशी शहर असल्यामुळे दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते.

फेरीवाले, रिक्षाचालकांमुळे त्रास
रेल्वेस्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, मात्र त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने प्रवासी पाणी पिणे टाळतात. स्थानकाबाहेर ठाण मांडून बसलेले फेरीवाले, प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये असलेली चढाओढ यातून मार्गक्रमण करताना प्रवाशांना कसरत करावी लागते.

वाशी रेल्वेस्‍थानक परिसरात भिकाऱ्यांचा वावर वाढला असून, त्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. ही मुले प्रवाशांच्या मागे लागून पैसे घेतात. याशिवाय फेरीवाले, गर्दुल्ल्यांचा वावर स्‍थानकात वाढल्‍याने प्रवाशांना त्रास होतो.
- मुकुंद विचारे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT