मुंबई

जिल्हा परिषदेच्या पाच गटांच्या नावात बदल

CD

वाडा, ता. १५ (बातमीदार) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये वाडा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांचा समावेश असून, जिल्हा परिषदेच्या गट रचनेमध्ये गटांची नावे बदलण्यात आली आहेत.

गारगाव (३१) गटाचे नाव बदलून वरसाळे करण्यात आले आहे, तर मोज (३२) गटाचे नाव बदलून गांध्रे, आणि मांडे (३३) गटाचे नाव बदलून गालतरे, केळठण (३४) गटाचे नाव बदलून खानिवली, आबिटघर (३५) गटाचे नाव बदलून खुपरी करण्यात आले आहे, मात्र कुडूस (३६) या गटाचे नाव पूर्ववत ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद गटांचे बदलण्यात आलेल्या नावामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या अगोदर जिल्हा परिषद गटांना नाव देताना त्या गटातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचे नाव देण्यात येत होते, मात्र या वेळी त्या गटातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या महसुली गावाचे नाव देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील एकूण सहा गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटांची नावे बदलण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषद गटांच्या नावात बदल करण्यात आला आहे. संबंधित गटांतील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महसुली गावांची नावे या गटांना देण्यात आली आहेत.
- भाऊसाहेब अंधारे,
तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, वाडा तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT