मुंबई

म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना २५ वर्षांनंतर मिळणार घरे

CD

म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना २५ वर्षांनंतर मिळणार घरे

कोकण मंडळाच्या सोडतीतील घरे लॉटरीशिवाय देण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या कोकण मंडळाने २००० साली काढलेल्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या तब्बल १५६ विजेत्यांना २५ वर्षांनी घरे मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. संबंधित विजेते ज्या चितळसर ठाणे येथील योजनेमधील घरांसाठी विजेते ठरले होते, ती घरे उभारण्यात तेव्हा महापालिकेने तांत्रिक अडथळा आणला होता. तेव्हापासून संबंधित अर्जदार घरांच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांना म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोडतीतील घरे लाॅटरीशिवाय देण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत.
म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने लाॅटरी काढल्या जातात. त्याचप्रमाणे कोकण मंडळाने २०००मध्ये काढलेल्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील २०० घरांचा समावेश होता. त्यानुसार अर्ज केलेल्या १५६ जणांना येथे घराची लॉटरी लागली खरी, पण संबंधित भूखंडावर आरक्षण असल्याचे तांत्रिक कारण पुढे करीत महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. दरम्यान, म्हाडाच्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे ते घराच्या प्रतीक्षेत होते. मात्र म्हाडाने आता चितळसर येथे सुमारे १,२०० घरे उभारली आहेत. त्यामुळे तत्कालीन संबंधित लाॅटरी विजेत्यांना घरे देण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत.

लाॅटरीशिवाय घरे मिळणार
म्हाडाच्या याआधीच्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना नुकत्याच जाहीर झालेल्या लाॅटरीसाठी अर्ज करावा लागणार नाही. त्यांना लाॅटरीशिवाय कागदपत्रांची तपासणी करून घरे दिली जाणार आहेत. दरम्यान, सदनिका निश्चितीसाठी केवळ लाॅटरी होईल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

किमतीचा प्रश्न
म्हाडने २००० साली काढलेल्या लाॅटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या १४३ चौरस फुटाच्या घराची किंमत केवळ ६५ हजार रुपये होती, तर अल्प उत्पन्न गटातील २१५ चौरस फुटाच्या घराची एक लाख ८७ हजार ५०० रुपये एवढी कमी किंमत होती; मात्र आता म्हाडाने विक्रीसाठी काढलेल्या चितळसर येथील अल्प उत्पन्न गटातील सुमारे ३५० चौरस फुटांच्या घराची किंमती ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे आताच्या किमतीनुसार घर घेणे आमच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हाडाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विजेत्या अर्जदारांनी म्हाडाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT