मुंबई

दंडात्मक कारवाईवेळी पिता-पुत्राची वाहतूक पोलिसांना मारहाण

CD

दंडात्मक कारवाईवेळी वाहतूक पोलिसांना मारहाण
तुळिंज पोलिस ठाण्यात बाप-लेकावर गुन्हा दाखल
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : दुचाकीवरून जाताना एका मुलाकडे गाडीचे लायसन्स नसल्याने दंडात्मक कारवाई केली. या रागातून बाप-लेकाने दोन वाहतूक पोलिसांना नालासोपाऱ्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या बाप-लेक आणि एक अन्य व्यक्ती अशा तिघांविरोधात नालासोपारा पूर्व तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा येथील सीतारा बेकारीजवळ मंगळवारी (ता. १५) सकाळी १० वाजता ही घटना घडली. पोलिसांवर सार्वजनिक ठिकाणी खाली पाडून मारहाण झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे मारहाण करणाऱ्या बाप-लेकाची नावे असून, ते नालासोपारा येथे राहतात. तर पोलिस हवालदार हनुमंत सांगळे आणि शेषनारायण आठरे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांची नाव आहेत. नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा येथे हे दोन कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना पार्थ हा मुलगा आपल्या बाइकवरून जात असताना त्याला पोलिसांनी लायसन्स विचारले. या वेळी पोलिसांना त्याच्याकडे लायसन्स आढळून आले नाही. दरम्यान, मुलाने आपल्या बापाला बोलावून घेतले. त्यानंतर पोलिस आणि बाप-लेकात वादविवाद झाला. यात बाप-लेकाने पोलिसांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबत तुळिंज पोलिसांनी दोघा बाप-लेकाविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यांना बुधवारी (ता. १६) न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT