मुंबई

सीवूड्समध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

CD

सीवूड्समध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सीवूड्स भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने शेजारील १० मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेतील मृत मुलगी सीवूड्स भागात राहण्यास होती तसेच ती अकरावीत शिक्षण घेत होती. रविवारी (ता. १३) दुपारी ही मुलगी अचानक घरातून निघून गेली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने त्यांनी एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या मुलीचा शोध सुरू केला होता. याचदरम्यान सोमवारी (ता. १४) सकाळी या मुलीचा मृतदेह ती राहत असलेल्या परिसरातील १० मजली इमारतीच्या खाली सापडला. प्राथमिक तपासावरून या मुलीने त्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Best Jobs 2026 : कोटींचा पगार, मोफत घर-जेवण अन् 1 वर्षात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड मिळणार! 'ही' कंपनी देत आहे अनोखी नोकरी

लग्नानंतर त्याचं ते सत्य समजलं... शुभांगी अत्रेचा मृत पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, 'आम्हाला वाटलेलं की तो...

Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT