मुंबई

शालेय प्रतिनिधींची मतदानातून निवड

CD

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार)ः देशातील समृद्ध लोकशाहीतील तत्त्वानुसार मतदानातून लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विवेक विद्यालय, विक्रोळी पार्कसाइट शाळेमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही शाळा, सांस्कृतिक विभाग तसेच क्रीडा विभागातील प्रतिनिधींची निवड मतदानातून करण्यात आली.
देशातील लोकशाहीचे बाळकडू शालेय जीवनात मिळावे, यासाठी विक्रोळीचे विवेक विद्यालय विविध उपक्रम राबवते. याच अंतर्गत शाळेतील प्रतिनिधींची मतदानातून निवड करण्यात आली. निवडणुकीमध्ये १० वीतील विद्यार्थी उमेदवार होते. सर्व उमेदवारांना विविध प्रकारचे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. उमेदवारांनी मुद्दे व चिन्ह यांचा प्रचार सर्व वर्गांमध्ये जाऊन केला. निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मतपत्रिकेवर शिक्का उमटवून मतदान केले.
़़़़़़़़़़़ः----------------------------------
विजयी उमदेवारांचे अभिनंदन
मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक मते मिळविणारे कृतिक बावदाने यास विद्यार्थी प्रतिनिधी, प्रांजल जाधव हिस विद्यार्थीनी प्रतिनिधी, संस्कृती पाटील यास सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी व समृद्धी गोपाळे यास क्रीडा विभाग प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Crime: पत्नी निघून गेली; नराधम बापानं १४ वर्षीय लेकीला वासनेचं बळी केलं अन्...; २ महिन्यांनी जे घडलं त्यानं सारेच हादरले

Ranji Trophy: अजिंक्य रहाणे - ऋतुराज गायकवाडचा शतकी धमाका; मुंबई - महाराष्ट्र संघांना सावरलं

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

SCROLL FOR NEXT