वसईत पक्ष्यांची वर्षा सहल, पक्षीप्रेमी आकर्षित
प्रसाद जोशी
वसई, ता. १६ (बातमीदार) ः पक्ष्यांची विविध प्रजाती सध्या वसईत दिसून येत आहे. भक्ष्याचा शोध आणि वातावरणातील बदल अनुभवण्यासाठी वसई सनसिटी परिसरात आशियाई ओपनबिल स्टॉर्क पक्ष्यांचा थवा तसेच पांढरा बगळा पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे वसई पक्षीप्रेमींना आकर्षित करू लागली आहे.
वसई तालुक्यात हिरवागार परिसर असून पाणथळ, मिठागर यासह मोकळा परिसर, डोंगर भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वसईत दरवर्षी सातासमुद्रापार पक्षी दाखल होत असतात. अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शनदेखील वसईकरांना मिळत असते. पक्षीप्रेमी, वसई-विरार शहर महापालिकेकडून पक्षी गणनादेखील केली जात असते.
ओपनबिल स्टॉर्क
आशियाई ओपनबिल स्टॉर्क हा पक्षी प्रामुख्याने भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये आढळतो. या पक्षाचा रंग राखाडी आणि पांढरा आहे. तर बगळ्याची माळदेखील उंच आकाशात उडताना दिसून येत आहे. या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी पक्षीप्रेमी वसईत दाखल झाले आहेत.
वसईला पक्षीवैभव
वसईला पक्षीवैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. याठिकाणी रंगीत करकोचा, श्वेत करकोचा मुग्धबलाक, खंड्या, बगळे, पाणकोंबडी, शराटी, पाणकावळे आदी पाणपक्षी तर घार, गरुड, पायमोज गरुड, कापसी हे शिकारी पक्षी, पायमोज, वटवट्या, झुडपी गप्पीदास, बुलबुल असे झुडपातील पक्षी व काळ्या शेपटीचा, फ्लेमिंगो, युरेशियन, सोन चिखले असे समुद्र पक्षी, जंगलात कुहुवा, पहाडी अंगारक, महाभृंगराज, सुतार, मोर असे अनेक पक्षी विविध हंगामांत वसईकरांना पाहण्याचा आनंद देत असतात.
फोटो ओळ ः
वसई ः पश्चिमेला दाखल झालेला पक्ष्यांचा थवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.