मुंबई

सानपाडा स्‍थानकाला बकाल स्‍वरूप

CD

सानपाडा स्‍थानकाला बकाल स्‍वरूप
अस्‍वच्छता, दुर्गंधीमुळे रेल्‍वेप्रवासी हैराण

जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : एपीएमसी मार्केट, तुर्भे गाव परिसर तसेच परिसरातील हजारो नागरिकांनी सानपाडा रेल्‍वे स्‍थानकातून वर्दळ असते. मात्र अस्‍वच्छता, दुर्गंधी, फेरीवाले, बेघरांचा वावर वाढल्‍याने रेल्‍वे स्‍थानकाला बकाल स्‍वरूप आले आहे. स्‍थानकातील दुकानाबाहेर तसेच मोकळ्या जागेत अतिक्रमण करण्यात आल्‍याने प्रवाशांची गैरसोय होते.
काही वर्षांपासून सिडकोकडून साफसफाईसाठी कंत्राट दिले जाते मात्र प्रत्‍यक्षात स्‍वच्छता होते की नाही, याचा आढावा घेतला जात नसल्‍याचे प्रवाशांचे म्‍हणणे आहे.
सानपाडा स्थानकाच्या तळमजला व पहिल्या मजल्यावर दुकाने आणि कार्यालये आहेत. त्यामुळे येथील लोक पूर्वेकडील स्थानक परिसरात वाहने उभी करतात. त्यामुळे स्थानकाच्या विद्रुपीकरणात भर पडते. स्थानकातील काही दुकानांसमोर पोटभाडेकरू ठेवले आहेत तर काही व्यापाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच राजरोसपणे व्यवसाय थाटला आहे.
स्टेशन प्रबंधक, तिकीट तपासनीस, व तिकीट घर अशा तिन्ही कार्यालयांमध्ये पाणी गळीत होते. तिकीट तपासनीस कार्यालयात स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी अनेकदा पाणी नसल्याने कर्मचाऱ्याची कुचंबना होते.

दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण
फलाटाकडे जाताना भुयारी मार्गातील गटारांवर झाकणे नाहीत. स्थानकाबाहेर आणि परिसरात मलनिस्सारण वाहिनीतून पाणी उघड्यावर वाहत असल्‍याने दुर्गंधी पसरते. सिडको प्रशासनाकडून रिकाम्या जागेत लावलेल्‍या झाडांजवळ कचरा आणि रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. स्थानकातच बार अँड रेस्टॉरंट असल्याने मद्यपींचा वावर असतो. परिणामी प्रवाशांना विशेषतः महिलांना असुरक्षित वाटते.

सानपाडा स्‍थानकात वेळा ट्रेन निघून गेली तरी बहुतेक वेळा इंडिकेटर बदलल्‍या जात नाही. त्‍यामुळे प्रवाशांचा संभ्रम होतो. पावसाळ्यात फलाट निसरडे होतात अनेक ठिकाणी गळती सुरू असते. सकाळच्या वेळेत तिकिटासाठी गर्दी असते.
- सुषमा मनसुख, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT