मुंबई

कल्याण पूर्वेत गढूळ पाण्याचा पुरवठा

CD

कल्याण पूर्वेत गढूळ पाण्याचा पुरवठा

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : जरीमरी नगर, छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी, चिकणीपाडा, विजयनगर, आमराई व अन्य काही भागांत मागील काही महिन्यांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत मनसेने महापालिकेच्या ‘५-ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात टॉवेल बनियन परिधान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देत समस्या न सुटल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण पूर्वेतील काही भागांत नागरिकांना होत असलेल्या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे अतिसार, कॉलरा, टायफॉईड, कावीळ असे साथीचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे डेंगीची लागण होऊन एका तरुणाने जीवही गमावला आहे. या आधीही कल्याण पूर्वेत मनसेने पाणीप्रश्नावर आंदोलन केले होते, मात्र पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवल्याने मनसेने अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. मोहिली उदंचन केंद्र, बारावे जलशुद्धीकरण प्रकल्प येथूनच पाणी दूषित येत असावे. अथवा तुटलेल्या व जीर्ण जलवाहिन्यांद्वारे दूषित पाण्याचा शिरकाव होत असावा. या सर्व बाबी तपासणे हे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे काम असल्याचे स्थानिक नागरिक योगेश गव्हाणे म्हणाले.

जलशुद्धीकरण केंद्रावरून दूषित पाणीपुरवठा झाला असता तर तो संपूर्ण शहराला झाला असता, परंतु अशी तक्रार फारशी कुठेही नाही. मनसेने केलेल्या तक्रारीनुसार पुढील काही दिवसांत दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात जाऊन मुख्य जलवाहिन्यांची तपासणी केली जाणार आहे. ‘५-ड’ सहाय्यक आयुक्त उमेश यमगर म्हणाले. चाळींचा परिसर असलेल्या काही भागांमध्ये जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून, त्या बदलण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुढील आठवड्यापासून नवीन वेळापत्रक
कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी पाण्याच्या वेळांमध्ये विभिन्नता आहे. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास, तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास पाणीपुरवठा होतो, तर काही भागांत दोन्ही वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने तेथील काही बेशिस्त नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करीत असल्याची बाब पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून नव्याने पाण्याचे वेळापत्रक बनविण्यात येऊन प्रत्येक विभागानुसार नव्या वेळा निश्चित केल्या जाणार असून, प्रत्येक भागात दिवसभरात फक्त एकदाच पाणीपुरवठा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT