लोटस तलावप्रकरणी केंद्राचा हस्तक्षेप
पाणथळ विभागाला सत्यता पडताळणीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : नवी मुंबईतील नेरूळ येथे लोटस तलावावर सिडकोने टाकलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. पर्यावरणवादी संघटनांनी पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर याप्रकरणी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय वने आणि पर्यावरण विभागाने राज्याच्या पाणथळ विभागाला सत्यता पडताळणीचे आदेश दिले आहेत.
नेरूळ येथील तीन हेक्टरवर लोटस तलाव विखुरलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या तलावावर अचानक सिडकोने मातीचा भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. सिडकोच्या या भराव टाकण्याला स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, स्थानिक माजी नगरसेवकांसहित इतर पर्यावरणवादी व सामाजिक संघटनांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे सिडकोने काही वेळाकरिता मातीचा भराव टाकण्याचे काम थांबवले होते; परंतु संघटनांची पाठ फिरताच पुन्हा सिडकोने या तलावावर पोलिस बंदोबस्तामध्ये भराव टाकण्याचे प्रकार सुरू केले. याप्रकरणी नॅट कनेक्ट फाउंडेशन या पर्यावरणवादी संघटनेने पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार केली होती. सलग दुसऱ्यांदा तक्रार केल्यानंतर त्वरित प्रतिसाद देत, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्य पाणथळ जागेच्या प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना या समस्येची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पीएमओ कार्यालयाने पाठवलेल्या आदेशात तत्काळ कार्यवाही करून अर्जदारालाही अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्याचे शास्त्रज्ञ पंकज वर्मा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात नमूद केले असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
...
सविस्तर माहिती पुरवली
फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी लोटस तलावप्रकरणी, नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटने राज्य पर्यावरण विभागामार्फत केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या तलाव आणि इतर ५६३ पाणथळ जागेची यादी जोडली आहे. लोटस तलावाच्या स्थितीबद्दल सिडको आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते. याची माहितीही नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्राला दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.