मुंबई

धरणांसाठी संततधारेची प्रतीक्षा!

CD

वसई, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार शहराला होणारा पाणीसाठा मुसळधार पावसामुळे वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना जलसमाधान मिळणार आहे. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक क्षमता असलेल्या सूर्या-धामणी धरणामध्ये एकूण ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर उसगाव धरणात त्यामानाने साठा कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ही धरणे लवकर भरण्यासाठी संततधार पावसाची प्रतीक्षा आहे.

वसई तालुक्यातील भूतपूर्व चार नगर परिषदा व गावांचा समावेश करून वसई-विरार महापालिका उभारण्यात आली आहे. त्याचे सुमारे क्षेत्रफळ ३८४ चौ.कि.मी. विस्तारलेले असून शहरातील लोकसंख्या अंदाजे २५ लाखांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत अनेक गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पाण्याची निकड वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचा साठा हा कमालीचा खालावतो. अशातच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.

वसई-विरार महापालिकेला सूर्या टप्पा एक व तीन या योजनेतून २०० द.ल.ली., मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या ४०३ द.ल.ली. पाणीपुरवठा योजनेतून १५० द.ल.ली. प्रतिदिन पाणी उपलब्ध होते. उसगाव आणि पेल्हार धरणातून एकूण ३० एलएलडी पाणी मिळते. त्यामुळे पावसाच्या पाण्याची मदार आहे. सद्य:स्थितीत असलेल्या पाणीसाठ्यातून धामणी धरणातील पाणी हे वर्षभर, तर उसगाव ७० दिवस व पेल्हार २०० दिवस पुरेल, असे महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यात वितरण करण्यात येणारे पाणी हे गढूळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका उपायुक्त दीपक झिंजाड यांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला असल्याने पाण्याचा साठा वाढू लागला असल्याचे दिसून येत आहे. आता पुढच्या दिवसांत पाऊस जोरदार झाला, तर धरणे काठोकाठ भरून जातील व जलचिंता दूर होईल.

उसगाव धरणामध्ये साठा कमी
जरी धामणी आणि पेल्हार धरणातील पाणीसाठा समाधान देणारा असला, तरी उसगाव धरणातील पाण्याची क्षमता व सध्या अस्तित्वात असलेले पाणी यात कमालीची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. उसगाव धरणामध्ये केवळ ४४ टक्के पाणी उपलब्ध आहे.

वीजपुरवठ्यावर गणित अवलंबून
पावसाळ्यात अनेकदा वीजसंकट येते. त्यामुळे पाणी वितरणावर परिणाम होतो. त्याचा फटका वसई-विरार शहरातील नागरिकांवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तांत्रिक बाबींकडे लक्ष घालण्यात आले आहे; परंतु यापुढे जोरदार वारा आणि पाऊस आल्यावर ही यंत्रणा अबाधित राहिली तरच शहराला नियमित पाणी मिळेल, अन्यथा पुन्हा अनियमित, कमी दाबाने व पाणीपुरवठा बंदला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

धरण साठा (दलघमी) उपयुक्त पाणी टक्के
सूर्या-धामणी २७६.३५ २११.८६७ ७६.६७
उसगाव ४.९६ २.२०३ ४४.४२
पेल्हार ३.५६ ३.०३० ८५.११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT