मुंबई

माधुरी हत्तीणीला हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तातंरित करा

CD

माधुरी हत्तीणीला हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तातंरित करा

कोल्हापुरातील जैन धार्मिक न्यासाला उच्च न्यायालयाचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : कोल्हापुरातील एका जैन धार्मिक न्यासाने तीन दशकांहून अधिक काळ ताब्यात ठेवलेल्या महादेवी नावाच्या (माधुरी नावाने प्रसिद्ध असलेल्या) हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील विशेष हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तांतरित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १६) दिले. धार्मिक अधिकार आणि प्राणी कल्याण यांच्यातील संघर्षात प्राणी कल्याण हे सर्वोच्च असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. 

माधुरीला दोन आठवड्यांच्या आत हस्तांतरित करण्याचे आदेश देताना या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनी आवश्यक परवाने देण्याचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.  कोल्हापुरातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थेत १९९२पासून माधुरी ही हत्तीण आहे; परंतु धार्मिक परंपरेच्या नावाखाली या हत्तीणीचे व्यावसायिक शोषण केले जात असल्याचा आरोप प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ने केला होता. त्यानंतर केलेल्या अनेक तक्रारी आणि तपासणीनंतर माधुरी हत्तीण चर्चेत आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यासाने केलेल्या याचिकेवर निर्णय देताना या हत्तीणीला जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या केंद्रात सद्यस्थितीला २३८ हत्ती राहतात. तसेच, या केंद्राने महादेवीला केंद्रात ठेवण्यास सहमती दर्शवली होती. 

तेलंगणा राज्य वक्फ बोर्डाने मोहरमनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत या हत्तीणीला सहभागी करण्यात आले होते. त्यासाठी चार लाख रुपये भाडे धार्मिक न्यासाला मिळाल्याचा आरोपही पेटाने केला होता. या हत्तीणीच्या शोषणाचे फोटोही न्यायालयात सादर केले होते. हत्तीणीला गर्दीत नेऊन दोरीने बांधण्यात आले व नियंत्रित ठेवण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर केला, त्यामुळे तिच्या पायाला दुखापत असताना व तिला संधिवाताचा त्रास असूनही नियंत्रित करण्यात आल्याचाही आरोप केला.  या आरोपांच्या शहानिशेसाठी एक उच्चस्तरीय समिती न्यायालयाने स्थापन केली. या समितीने हत्तीणीच्या अनेक तपासण्या करून अहवाल सादर केला. या अहवालात ही हत्तीणीला विविध शारीरिक त्रास होत असल्याचे, तिच्या शरीराच्या विविध भागांवर दुखापतीच्या जखमा असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT