उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : भरपावसात अंग ओले होत असतानाही डोळ्यांत ठामपणा आणि आवाजात हक्कासाठीचा आक्रोश, अशा दृढ निश्चयाने शेकडो दिव्यांग बांधवांनी मंगळवारी (ता. १५) प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी आपले हक्क मिळवण्यासाठी आवाज बुलंद केला. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले असून, २०१६पासून रखडलेल्या शासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी महापालिकेला धारेवर धरले आहे.
२०१६मध्ये सरकारने जीआर काढून स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना बाजारपेठांमध्ये २०० चौरस फुटांची जागा स्टॉलसाठी द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र उल्हासनगर महापालिकेने याची अंमलबजावणी न करता या आधी लावलेले स्टॉल्स हटवले. एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दिव्यांग कल्याण योजनांचाही लाभ बऱ्याच गरजू दिव्यांगांपर्यंत पोहोचलेला नाही, अशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.