मुंबई

निजामपूरमध्ये पाणीचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

CD

भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका पाणीपुरवठा विभागाने कोंबडपाडा-संगमपाडा येथील जलकुंभ भरण्यासाठी नाल्यातून मुख्य जलवाहिनी नेली आहे. त्या जलवाहिनीला छिद्र पाडून भिवंडीकरांचे लाखो रुपयांचे पिण्याचे पाणी चोरून ग्रामीण भागातील मीठपाडा येथीव चाळीतील नागरिकांसाठी नेण्यात आली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कोंबडपाडा-संगमपाडा येथे असलेल्या जलकुंभात पाणी भरण्यासाठी महापालिकेच्या नाल्यामधून जलवाहिनी नेलेली आहे. या जलवाहिनीला छिद्र पाडून रवी गायधर सिंह याने कासारआळी-कोंबडपाडा भागातील भंडारी गोदामाच्या बाजूने नळजोडणीसाठी जलवाहिनी अंथरली आहे. ही जलवाहिनी पुढे कामवारी नदीतून मीठपाडा येथे नेहापार्कमधील चाळीत जाते. ही माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, उपअभियंता सरफराज अन्सा‍री, भरारी पथकप्रमुख विराज भोईर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भंडारी गोदामाजवळ नाल्यात असलेल्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पडून एक व्यासाचे दोन नळजोडणी नाल्यातून आणि कामवारी नदीतून ग्रामीण भागातील नेहा पार्क, मीठपाडा येथील चाळीसाठी अनधिकृतपणे घेतल्याचे आढळून आले. यात जलवाहिनीचे नुकसान झाले असून, घरगुती जोडणीनुसार १२ हजारांप्रमाणे ९६ हजार रुपयांची पाणीचोरी केल्याचे आढळून आले. असे चार वर्षांचे मिळून १ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रवी सिंहविरोधात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy, Video: W,W,W,W,W,W... दोन भारतीय गोलंदाजांनी एकाच डावात घेतल्या दोन हॅटट्रिक! ९० वर्षात पहिल्यांदाच घडलं असं

Arabian Sea Low Pressure : अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार?

अमरावतीत 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीचा राहत्या घरी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Burn Belly Fat: जिमला न जाता घरच्या घरी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दिपिका पदुकोणच्या ट्रेनरने दिल्या खास टिप्स, पाहा Video

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

SCROLL FOR NEXT