मुंबई

शेजारणीला शेजारणीने दगडाने मारून केले जखमी

CD

जाब विचारला म्हणून शेजारणीला मारहाण
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला दुसऱ्या शेजारी राहणाऱ्या महिलेने शिवीगाळ करून दगडाने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दगडाने मारहाण करणाऱ्या शेजारणीच्या विरोधात गुरुवारी (ता. १७) कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना गायकवाड (वय ३९) असे गुन्हा दाखल झालेल्या शेजारणीचे नाव आहे. तर जयश्री लोहार (५०) असे जखमी शेजारणीचे नाव आहे.
रंजना आणि जयश्री कोनगाव येथील युनियन बँकेसमोरील अनुसया अपार्टमेंटमध्ये एकमेकांचे शेजारी आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. १७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रंजना आणि जयश्री यांचा मुलगा ओंकेश यांच्यात भांडण झाले होते. त्या वेळी ओंकेशने त्याची आई जयश्रीला बोलावून घेतले असता त्यांनी तिच्या मुलाला का मारले, असा जाब रंजनाला विचारताच मागील भांडणाचा राग मनात धरून रंजनाने जयश्रीसह तिच्या मुलाला शिवीगाळ करून खाली पडलेला दगड उचलून जयश्रीच्या डोक्यात व कानाच्या वर मारून तिला जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : ‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Shashikant Shinde: कंत्राटदार काय जावई आहे का?, शशिकांत शिंदे; सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत आक्रमक, महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन अडचणीत!

SCROLL FOR NEXT