मुंबई

ठाण्यात मंगळवारी पाणीबाणी

CD

ठाण्यात मंगळवारी पाणीबाणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ :
ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २२) सकाळी ९ वाजल्यापासून बुधवारी (ता. २३) सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरण कंपनीमार्फत शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुद्ध जल उदंचन केंद्र येथील पाइपलाइन गळती होत असून, ती बंद करण्याची आवश्यक कामे करण्यात येणार असल्याने या कालावधीत शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा तसेच पालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

या ठिकाणी पाणीपुरवठा बंद
या कालावधीत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डॉगरीपाडा, वाघबीळ, आदी ठिकाणाचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर, प्रऋतुपार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्य्राचा काही भाग मंगळवारी रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. अशारीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT