मुंबई

अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी

CD

अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी
महापालिकेचे तंत्रस्नेही पाऊल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुंबई महानगरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली’ सुरू करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. शनिवारपासून (ता. १९) ही सेवा उपलब्ध होणार आहे.
पालिका प्रशासन मुंबईकरांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा उपलब्ध करून देत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे. अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे.
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच, स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचाऱ्यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल. यासोबत ऑफलाइन व्यवस्था सुरू असणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
...
कशी मिळणार सुविधा?
स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली/ॲप्लिकेशन शनिवारपासून मुंबई महापालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी ‘अर्ज करा’ या सदरात उपलब्ध होणार आहे.
...
सुविधा कोणत्या?
- निधन झालेल्या व्यक्तीच्या स्थानापासून पाच किलोमीटर परिसरातील किंवा इतर स्मशानभूमी/दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्लॉट बुक करणे.
- स्मशानभूमी/दफनभूमीमधील उपलब्धता पाहणे.
- नागरिकांच्या प्रथेनुसार निवडीचा पर्याय
- अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT