मुंबई

ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी राज्याचा कॅलिफोर्नियाशी करार

CD

ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी राज्याचा कॅलिफोर्नियाशी करार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि परस्पर सहकार्य आणि धोरण विकासासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने आणि बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी गुरुवारी (ता. १७) सामंजस्य करार केला. यामुळे ऊर्जा विभागातील संशोधन आणि नव कल्पनांना गती मिळणार असून वीजनिर्मिती, वीज वितरणामध्ये आधुनिक बदल घडू शकणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात संशोधन, तांत्रिक नवकल्पना आणि धोरणात्मक सहकार्याला गती मिळणार आहे. ऊर्जेचा स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारा पुरवठा, ऊर्जा साठवणूक उपाय, वीज बाजार रचना, ग्रीड प्रसारण प्रणालीतील सुधारणा, हवामानाशी जुळवून घेणारी धोरणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये संयुक्त काम होणार आहे. या करारावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी., महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार उपस्थित होते. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव उपस्थित होते.
...
काराराचे फायदे
- स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या विजेचा विकास
- ऊर्जा साठवण तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन
- वीज मार्केटची रचना आणि धोरण निर्मिती
- ऊर्जा ग्रीड प्रसारण क्षेत्रातील नवोन्मेष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT