मुंबई

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी पाच महिन्यांनी ताब्यात

CD

पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी ताब्यात
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडीत १७ फेब्रुवारी रोजी कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर धक्काबुक्की करीत दगडफेक करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह त्याच्या आठ साथीदारांना गुरुवारी (ता. १७) पाच महिन्यांनी नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. उमेश गायकवाड, सचिन साठे, ओम वाघमारे, शुभम परूळेकर, आशीष सरवदे, गौरव उके, परमेश्वर गायकवाड, आशीष मिश्रा ऊर्फ भय्या अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी (ता. १८) न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील वऱ्हाळदेवी नगर येथील एका पोक्सो कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व पोलिस कर्मचारी सुनील शिंदे व अब्दुल तडवी हे पोलिस वाहनासह १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गेले होते. त्या वेळी उमेश व त्याच्या २५ ते ३० साथीदारांनी पोलिस पथकास शिवीगाळ, धक्काबुक्की करीत दगडफेक केली. पोलिस वाहनाची काचही फोडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी उमेश गायकवाड व त्याच्या १४ साथीदारांविरोधात दाखल गुन्ह्यात आठ जण फरार होते. त्यांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT