मुंबई

ओला-उबेर कार चालकांची भिवंडीत निदर्शने

CD

ओला-उबेर कारचालकांची भिवंडीत निदर्शने
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : ओला-उबेर या ऑनलाइन कार सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून कारचालकांची पिळवणूक सुरू असून याविरोधात भिवंडीत ओला-उबेर कारचालकांनी निदर्शने करीत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. १८) अवचितपाडा येथे झालेल्या या निदर्शनात सुमारे १०० कारचालक सहभागी झाले होते.
ओला-उबेर कंपनीकडून अधिक मोबदल्याचे प्रलोभन दाखवून अनेक कारचालकांची अनेक वर्षांपासून पिळवणूक सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून प्रति किलोमीटरचे दरसुद्धा न वाढवल्याने अनेक कारचालक कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. तर बऱ्याच वेळा कंपनीकडून आपल्या कंपनीच्या कारला प्रथम प्राधान्य देऊन त्यानंतर आम्हाला भाडे दिले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे, अशी तक्रार नौशाद अन्सारी या कारचालकाने केली आहे.
ओला-उबेर आम्हाला अवघे आठ ते नऊ किलोमीटर दर देतात; पण सरकारने रिक्षा व कारसाठी २३ रुपये मीटर दर निश्चित केला आहे. मग आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न कारचालक अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT