मुंबई

चोरट्यांना नागरिकांकडून चोप

CD

अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : नशा करण्यासाठी पैसे मिळावे, यासाठी एका बंगल्यात तीन चोर घुसल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. चोरी करण्यासाठी घुसलेल्या या तीन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडत बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकाजवळील शिवसृष्टीसमोर असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास तीन चोरटे चोरी करण्यासाठी घुसले. बंगल्याच्या खिडकीची ग्रील तोडून त्यांनी आत प्रवेश केला. मात्र, बंगल्यातील सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे त्याने आरडाओरडा केला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बंगल्यात चोर घुसल्याचे समजताच त्यांनी चोराला पकडण्यासाठी धाव घेतली. एक चोर तळमजल्यावरच सापडला, तर दुसरा चोर गच्चीच्या दाराजवळ लपून बसलेला होता. या दोघांनाही जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, तिसरा चोर फरार झाला होता; मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यालाही पकडून पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. नशा करण्यासाठी पैसे मिळावेत, या उद्देशाने हे चोरटे बंद बंगल्यांमध्ये चोऱ्या करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT