मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
माणगाव (बातमीदार)ः कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेअरिंग अँड सर्व्हिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई, आवरनेस ग्रुप मुंबई, स्वयं फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदच्या ५३ शाळांना आणि ६० अंगणवाडी शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. माणगाव तालुक्यातील एकूण ५३ जिल्हा परिषद शाळेतील १,०८० विद्यार्थी तसेच ६० अंगणवाडी शाळांतील ६१० विद्यार्थ्यांना ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये रा. जि. प. शाळा देवळी, मूर, भिंताड, नागाव, चिंचवली, लोणेरे, पहेल, नवघर, उसरघर, न्हावे, पन्हळघर खु., झोरेवाडी, पन्हळघर बु., आवाप.बु., वाघोसे, गारळ, जावळी, लोणशी, वावे, उणेगाव, चापडी, वडगावकोंड, कुरवडे, शिरवली, दहिलीकोंड, देगाव, रिले, खर्डी बु., खर्डी बु.आ. वाडी, राजिवली, सुरव/तळे, खरवली, पेण, उमरोली/खरवली कोशींबल, दाखणे, विघवली, कुशेडे/तळे, मुठवली, माकटि, माकटि आ. वाडी, कालवण, साळवे, होडगाव, मढेगाव, मढेगांवकोंड, केस्तुली, हरकोलकोंड, रानवडेकोंड या शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
.....................
अलिबागमध्ये स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन
अलिबाग (वार्ताहर) ः बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगाराविषयी तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र या उपक्रमाविषयी माहिती व्‍हावी, यासाठी मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अलिबाग येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.
...................
प्राचार्य पोरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन
पेण (बातमीदार) ः ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद वस्तुस्थिती, सद्य:स्थिती, अपेक्षा व गरज’ या पुस्तकाचे प्रकाशन व नातीच्या शैक्षणिक यशाचा कौतुक सोहळा भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात उत्‍साहात पार पडला. या वेळी पेण एज्युकेशन सोसायटी व सोबती संघटनेचे माजी अध्यक्ष बापुसाहेब नेने अध्यक्षस्थानी होते, तर साहित्यिक चारुदत चिखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन तसेच कन्या विद्यालयातील शिक्षकांनी गायलेल्या प्रार्थनेने झाली. सुमिता पोरे यांनी गुलाबपुष्प व वृक्ष रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सर्व मान्यवर व लेखकांचा परिचय शांता भावे यांनी केला. पीयूष्याच्या वैचारिक यशाचा आढावा हर्षदा पोरे कल्लूरकर यांनी घेतला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. सोबतीतर्फे बापूसाहेब यांनी चांदीची भेटवस्तू व शुभेच्छा देऊन कौतुक केले. त्यांच्या शुभेच्छाचे वाचन करण्यात आले. चारुदत्त चिखले यांनी पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा, उद्देश, अपेक्षा यावर भाष्य केले. प्राचार्य पोरे यांनी पेण एज्युकेशन सोसायटीला बक्षीस फंडासाठी ५० हजार रुपये आणि सोबतीला २५ हजार देणगी दिली. या कार्यक्रमास पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, वसंतराव आठवले, बाळासाहेब जोशी, प्राचार्य पाटील, मुख्याध्यापिका अंजली जोशी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा पोरे कल्लोरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन अमेय पोरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
............
शालेय विद्यार्थ्यांना छत्र्या, वह्यावाटप
रोहा (बातमीदार) ः खासदार सुनील तटकरे यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अमोल टेमकर यांच्या सौजन्याने शुक्रवारी तालुक्यातील खारापटी, पडम आणि निडी येथील शालेय विद्यार्थ्यांना छत्री व वह्यावाटप करण्यात आले. कार्यक्रम केंद्र शाळा खारापटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी माजी सभापती राजेश्री राजेंद्र पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका कार्याध्यक्ष मयूर खैरे, माजी सरपंच संदीप चोरगे, संतोष भोईर, नवनीत डोळकर, विभा चोरगे, करंजे गुरुजी, भगवान गोवर्धने, सुनील चोरगे, मंगेश चोरगे, निवास खरिवले, निडीतर्फे अष्टमीचे सदस्य अनंता चौलकर, शीतल चोरगे, तेजल जोशी, चंद्रकांत वाटवे, योगेश ठाकूर, उपसरपंच परेश म्हात्रे, सतीश मोहिते, अंकुश ताडकर, प्रीतम मोहिते, मिळनाथ नाईक, सुहास कारभारी व गावातील ज्येष्ठ मंडळी त्याचप्रमाणे शिक्षिका आदी उपस्थित होते.
......................
दीपक राऊळ ‘खासदार श्री २०२५’चा मानकरी
उमेश चाळके, विराज नारंगीकर, रौनिक शिर्के, हनुमान भगत, अमित कुमार यांच्याकडून दमदार प्रदर्शन
रोहा, ता. १९ (बातमीदार) ः खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘खासदार श्री २०२५’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दीपक राऊळ याने ‘खासदार श्री २०२५’च्या किताबसहित स्पर्धेतील बेस्ट पोझर म्हणून किताब पटकवला. तर इम्प्रूह बोल्डीबिल्डरचा मानकरी अमित कुमार ठरला. स्पर्धेतील विविध वजन गटात उमेश चाळके, विराज नारंगीकर, रौनक शिर्के, हनुमान भगत आणि अमित कुमार यांनी दमदार प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपले नाव कोरले.
शुक्रवार रात्री उशिरापर्यंत रोह्यातील भाटे सार्वजनिक वाचनालयात या स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेतील ७० किलो गटात दीपक राऊळ हा बलदंड व्यायामपटू प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याला चांदीची गदा, आकर्षक चषक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपविजेता म्हणून प्रथमेश खत्री तर मोहम्मद रानवल याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चतुर्थ क्रमांक उल्हास जाधव तर प्रथमेश शेळकर याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ६५ किलोंच्या वजनी गटात अमित कुमार याने विजेतेपद पटकविले, तर उप विजेता म्हणून प्रणय मुडकर याला गौरविण्यात आले. तसेच विवेक विशे हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. चतुर्थ क्रमांक अनिकेत पाले तर यश मोरे याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ६० किलो वजन गटात हनुमान भगत याने प्रथम क्रमांक मिळवून चषकावर आपले नाव कोरले. उपविजेता म्हणून उमेश चाळके मानकरी ठरला, तर अतिष केणी याने तिसरा क्रमांक मिळविला. प्रसन्ना घाणेकर याने चतुर्थ क्रमांक मिळविला तर पाचव्या क्रमांकावर रिद्देश मोरे याला समाधान मानावे लागले. ५५ किलो वजनाच्या गटात रौनिक शिर्के याने चमकदार कामगिरी करून चषकावर आपले नाव कोरले. तर समीर साठे याला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले. विनोद लाड याला तिसऱ्या क्रमांकाने गौरविण्यात आले. तर जगदीश धाडवे याने चतुर्य क्रमांक पटकविला तसेच अनिकेत शिंदे याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
...........
शेकाप महिला आघाडीतर्फे छत्रीवाटप
अलिबाग (वार्ताहर) ः माजी नगराध्यक्ष स्व. ॲड. नमिता प्रशांत नाईक यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी मोफत छत्रीवाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १८) आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत भाजी व मच्छीविक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. अलिबागची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमिता नाईक यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. या कार्यक्रमाला अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, शैला पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक वृषाली ठोसर, ॲड. नीलम हजारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग शहर महिला आघाडीने केले होते.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT