मुंबई

नेरुळ येथील माँ. मीनाताई ठाकरे रुग्णालयात आयसीयू सुरु

CD

नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात आयसीयू सुरू
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार पक्षाच्या दणक्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. कित्येक वर्षांपासून आयसीयू बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते व नाहक जीवदेखील जात होते. यासंदर्भात आयसीयू सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांना घेराव घालून तत्काळ आयसीयू सुरू करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर डॉ. प्रशांत जवादे यांनी सात दिवसांत पाच आयसीयू बेड्स सुरू करू व मनापाच्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिक संख्येने आयसीयू बेड्स सुरू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. आता या रुग्णालयात आयसीयू सुरू झाले आहेत. हे आयसीयू बेड्स सुरू करण्यासाठी डॉ. उद्धव खिलारे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांची भेट घेऊन आभार मानले. या वेळी वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष तुषार कचरे,
युवक काँग्रेसचे विशाल भिलारे, संदीप मोहिते, राम पुजारे, विश्वजित भोईटे, केतन वालकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT